शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:35 IST

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही ...

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही अशी स्थिती आहे. सध्या बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे.राजाराम बंधाºयाला एकूण ५९ मोहरी आहेत. त्यापैकी काही मोजक्याच मोहरींतून पाणी खालील बाजूस सोडले आहे. उर्वरित सर्व मोहरी बंद आहेत. त्यामुळे बंधाºयाजवळील पाणी प्रवाहित न झाल्याने दूषित झाले आहे. या पाण्यात पंचगंगा नदीतून तसेच जयंती नाल्यातून आलेला कचरा सध्या बंधारा अडविल्यामुळे अडकून पडला आहे. याशिवाय जयंती नाल्यातून व बावड्यातील दोन-तीन नाल्यांतून वाहून आलेले दूषित पाणी बंधाºयाजवळ तटल्याने बंधाºयाजवळील पाणी हिरवे-काळे झाले आहे. पाण्याला उग्र वास येत आहे.या दूषित पाण्याच्या उग्र वासाने बंधाºयावरू ये-जा करणाºया वाहनधारकांना नाकाला काहीवेळा रुमाल लावावा लागतो. येथे पोहण्यासाठी दररोज येणाºया तरुणांची संख्याही दूषित पाण्यामुळे रोडावली आहे. या दूषित पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू मासे मृत होण्यास सुरुवात झाली आहे.राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास....सध्या राजाराम बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. त्यामुळे बंधाºयातून योग्य त्या प्रमाणात खालील बाजूस पाणी सोडल्यास दूषित पाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच ही पातळी भरून येण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास शिंगणापूर उपसा केंद्राची पाणी पातळीही स्थिर राहील.नेजदार फौंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविणारयेथील डॉ. संदीप नेजदार फौंडेशनच्यावतीने तसेच बावड्यातील काही तरुण मंडळांची मदत घेऊन राजाराम बंधारा परिसर तसेच बंधाºयात अडकलेला कचरा, निर्माल्य यांची स्वच्छता केली जाईल, असे डॉ. संदीप नेजदार फौंडेशनचे अध्यक्ष व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी सांगितले.शेतात पिण्यासाठी घरचे पाणीराजाराम बंधाºयापासून ते एमआयडीसी पुलापर्यंत शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर पूर्वी नदीचे पाणी पीत असत, परंतु आता शेतकरी, शेतमजूर कधीही नदीचे पाणी शेतात काम करत असताना पीत नाहीत. त्यासाठी घरातून पाणी नेले जाते. इतकी दूषित पाण्याची भीती आता लोकांना वाटत आहे.